कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Rahul Gandhi यांच्या Vote Chori आरोपाने भाजप घायाळ, कॉंग्रेस आक्रमक, पुढे काय होणार?

11:16 AM Aug 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

5 महिन्यांच्या कालावधीत मतदार यादीत इतक्या मोठ्या संख्येने वाढ होणे अस्वाभाविक

Advertisement

By : संतोष पाटील 

Advertisement

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘वोट चोरी’चा आरोप करत महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय वातावरण तापवले आहे. भाजपने या आरोपांना खोटे ठरवले असले, तरी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने हा मुद्दा जनतेपर्यंत नेण्याचा आणि कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.

येत्या काळात या प्रकरणाचा राजकीय, कायदेशीर आणि सामाजिक परिणाम काय होतील हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल. राहुल गांधी यांच्या मतानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सुमारे 40 लाख संदिग्ध मतदार जोडले गेले. विशेषत: 5 महिन्यांच्या कालावधीत मतदार यादीत इतक्या मोठ्या संख्येने वाढ होणे अस्वाभाविक असल्याचा राहुल गांधी यांचा दावा आहे.

बंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात 1 लाख 250 बोगस मतदार जोडल्याचा आरोप त्यांनी कागदपत्रांसह केला. ‘वोट चोरी’चा आरोप करताना गांधी यांनी एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नाव नोंदणी, अनेक मतदारांचे बनावट पत्ते, एकाच प्लॅटमध्ये 50 ते 60 मतदार, ओळख लपवण्यासाठी मतदार यादीत चुकीचे फोटो, 70 ते 95 वर्षांच्या मतदारांची प्रथमच नोंदणी दाखवत फॉर्म नं. 06चा गैरवापर, एका छोट्या घरात 80 मतदार, बियर कारखान्याच्या पत्त्यावर अनेक मतदार नोंदवले गेल्याचा आरोप दाखवण्याचा प्रयत्न केला.

संविधानाविरुद्धचा गुन्हा निवडणूक आयोगाने डिजिटल डेटा उपलब्ध करुन दिला असता तर या गैरप्रकाराचा पर्दाफाश करण्यास अवघा 1 मिनिट पुरेसा आहे. मात्र, आयोगाने 7 फूट उंच कागदपत्रांचे गठ्ठे दिले. त्याचे विश्लेषण करण्यास 6 महिने लागल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. हा गैरप्रकार ‘1 व्यक्ती, 1 मत’ या संवैधानिक तत्त्वाला धक्का असून संविधानाविरुद्धचा गुन्हा असल्याचे गांधी यांची म्हणणे आहे.

यावर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना त्यांच्या दाव्यांच्या समर्थनासाठी शपथपत्र सादर करा. अन्यथा भारतीय दंड संहितेच्या कलम 227 आणि जनप्रतिनिधी कायद्याच्या कलम 31 अंतर्गत कारवाई होऊ शकते, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीत 1186 बूथ लेव्हल ऑफिसर, 288 रिटर्निंग ऑफिसर आणि 126 राजकीय पक्षांचे बूथ एजंट्स उपस्थित होते. यावरून प्रक्रिया निष्पक्ष असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

तेव्हाच का हरकत घेतली नाही?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना ‘खोटे’ आणि ‘हार पचवण्यासाठीचा प्रयत्न’ ठरवले. त्यांनी थेट वैयक्तिक टीका करताना, राहुल गांधींच्या डोक्याची ‘चीप चोरी झाली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट’ झाल्याचे सांगत खिल्ली उडवली.

कधी 75 लाख, कधी 40 लाख, कधी 1 कोटी अशी राहुल गांधी यांची आकडेवारी बदलत असून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. मंत्री आशीष शेलार यांनी राहुल यांच्या आरोपांना ‘हरलेल्यांचा अहंकार’ असे संबोधले. काँग्रेसकडे 27 हजार बुथ एजंट्सनी मतदार यादीवर तेव्हाच का हरकत घेतली नाही? टक्केवारी वाढली असली, तरी ती सर्वत्र आणि मुस्लिमबहुल भागांतही दिसून आल्याचे स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाची विश्वासार्हता निवडणूक आयोगाने राहुल गांधींना शपथपत्राची मागणी करून आणि त्यांचे आरोप दिशाभूल करणारे ठरवून स्वत:च्या बचावाचा प्रयत्न केला आहे. परंतु, डिजिटल डेटा न देणे आणि सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याच्या निर्णयामुळे आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात राहुल गांधी यशस्वी झाल्याचे तज्ञांचे मत आहे.

कायदेशीर आणि सामाजिक लढाई राहुल गांधी यांनी बंगळुरूत आंदोलनाची घोषणा केली. तर काँग्रेस याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मुद्दा कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर तीव्र होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींनी काय साधले ?

विरोधी पक्षांना एकजुटीची संधी : काँग्रेस आणि महाविकास आघाडीला हा मुद्दा जनतेपर्यंत नेण्याची संधी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीतील यश आणि विधानसभा निवडणुकीतील अपयश यामुळे काँग्रेसला हा मुद्दा जनतेसमोर मांडण्याची मोठी संधी आहे. ‘वोट अधिकार रॅली’ आणि ‘रास्ता रोको’सारखी आंदोलने याच दिशेने पावले टाकत आहेत.

भाजपवर दबाव : भाजपने या आरोपांना ‘निराधार’ ठरवले असले, तरी राहुल गांधी यांच्या आरोपामुळे जनमानसात संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. मतदार यादीतील गैरप्रकारांचे पुरावे आणि आयोगाची अपारदर्शकता यामुळे जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास डळमळू शकतो, असे राजकीय अभ्यासक सांगतात.

Advertisement
Tags :
@CONGRES#bangalore#Mahavikas Aghadi#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedialoksabha ElectionRahul Gandhi Vote ChoriVote Chori
Next Article