महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तेलंगणात राहुल गांधींचा ऑटोमधून प्रवास

05:02 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील सर्वसामान्यांशी संवाद साधण्यावर भर दिला होता. काँग्रेस नेत्याने मंगळवारी सकाळी हैदराबादच्या ज्युबली हिल्समध्ये ऑटोचालक, गिग वर्कर्स आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राज्य काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रेवंत रे•ाr तसेच स्थानिक उमेदवार मोहम्मद अझहरुद्दीन उपस्थित होते.

Advertisement

गिग कामगारांच्या कल्याणाच्या मुद्द्यांकरता एक कल्याण महामंडळ स्थापन केले जाऊ शकते असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तर गिग वर्कर्सनी स्वत:च्या समस्या राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या आहेत. यानंतर राहुल गांधी यांनी ऑटोमधून प्रवास करत त्याच्या चालकाशी संवाद साधला.

Advertisement

कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी देखील राहुल गांधी यांना नोकरीची सुरक्षा आणि अन्य लाभ नसल्याने निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल सांगितले. काँग्रेस राज्यात सत्तेवर आल्यास मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत संबंधितांच्या कल्याणासाठी उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे.

राजस्थानात आम्ही गिग वर्कर्सची एक श्रेणी तयार केली आहे. यात जेव्हा एखादी ऑर्डर येते, तेव्हा काही पैसे कंपनीकडून संबंधितांच्या सामाजिक सुरक्षेसाठी म्हणजेच विमा, पेन्शनसाठी वर्ग केले जातात. अशाचप्रकारे तेलंगणात काँग्रेस सत्तेवर आल्यावर संबंधितांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणली जाणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article