For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयआयटी मुंबई विद्यार्थी मृत्यू प्रकरण; राहुल गांधींचा पालकांशी संवाद

02:54 PM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयआयटी मुंबई विद्यार्थी मृत्यू प्रकरण  राहुल गांधींचा पालकांशी संवाद
Advertisement

मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी रात्री मृत विद्यार्थी साहिलच्या आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

Advertisement

सुमारे 17 मिनिटांच्या संभाषणात राहुल गांधी यांनी पालकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. विद्यार्थ्याच्या मृत्यूमागील परिस्थिती, संबंधित प्राध्यापकाची पार्श्वभूमी तसेच विद्यार्थ्याला यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते का, याबाबत त्यांनी कुटुंबीयांकडून माहिती घेतली.

यावेळी युवक काँग्रेसचा एक पदाधिकारीही उपस्थित होता. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्याच्या आई-वडिलांशी स्वतंत्रपणे संवाद साधल्यानंतर कुटुंबीयांचे वकील अॅड. निखिल कांबळे यांच्याशीही चर्चा केली.

Advertisement

संबंधित प्राध्यापकाची यापूर्वीची पार्श्वभूमी, विद्यार्थ्याने आपल्या अडचणींबाबत कोणाकडे काही सांगितले होते का आणि त्याला कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा अन्य त्रास झाला होता का, याची माहिती राहुल गांधी यांनी घेतल्याचे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement
Tags :

.