राहुल गांधी हे कमजोर नेते : तृणमूल खासदार
इंडी आघाडीला कणखर नेत्याची गरज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाचा प्रभाव आता इंडी आघाडीतही दिसून येऊ लागला आहे. याचे संकेत तृणमूल काँग्रेसने देण्यास सुरुवात केली आहे. तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवारी राहुल गांधी यांना एक कमजोर नेता संबोधिले आहे. काँग्रेस हरियाणा किंवा महाराष्ट्रात अपेक्षेनुसार यश मिळवू शकलेली नाही. काँग्रेस चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आम्हाला होती. परंतु ती फोल ठरल आहे. इंडी आघाडी असली तरीही अपेक्षित कामगिरी करण्यास काँग्रेस अपयशी ठरली आहे. भाजपविरोधात लढायचे असल्यास इंडी आघाडी मजबूत असणे आवश्यक आहे आणि याकरता एका कणखर नेत्याची गरज आहे. आता हा नेता कोण असू शकतो हाच कळीचा मुद्दा आहे. काँग्रेसने आतापर्यंत सर्व प्रयोग केले परंतु ते अयशस्वी ठरले आहेत असे कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे.