For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत न्याय यात्रे दरम्यान राहुल गांधी वायनाडमध्ये!

06:31 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत न्याय यात्रे दरम्यान राहुल गांधी वायनाडमध्ये
Advertisement

त्तसंस्था/ वायनाड

Advertisement

काँग्रेस खासदार राहुल गांधी रविवारी वायनाडला पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी येथे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमधून जात आहे. रविवारी राहुल गांधींचा प्रवास वाराणसी ते भदोहीला जाणार होता, मात्र प्रवास मध्येच थांबवून राहुल गांधी अचानक वायनाडला रवाना झाले. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधी वायनाडला पोहोचल्याची माहिती दिली.

वायनाडमधून परतल्यानंतर पूर्वस्थळावरून यात्रा सुरू होणार आहे. शुक्रवारी वायनाडमध्ये जंगली हत्तीने एका व्यक्तीवर हल्ला केला होता. ज्यात जखमी व्यक्तीचा शनिवारी कोझिकोडच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित महिला वनविभागाची इको टुरिझम गाईड होती. कुऊवा बेट या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सदर मृत क्यक्तीच्या कुटुंबियांची भेट घेत राहुल गांधी यांनी त्यांचे सांत्वन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.