राहुल गांधी चौकशीच्या फेऱ्यात
महिलांच्या लैंगिक छळाच्या वक्तव्यप्रकरणी नोटीस : दिल्ली पोलिसांना दिले चार पानी उत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिला बलात्कार पीडितांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. दिल्ली पोलिसांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी दाखल होत नोटीस दिली. दिल्ली पोलिसांच्या या नोटिशीला राहुल यांनी 10 मुद्यांमध्ये 4 पानांचे उत्तर दिले आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी भाषणानंतर 45 दिवसांनी पोलिसांनी अवलंबलेल्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दिल्ली पोलीस रविवारी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. राहुल यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या ‘लैंगिक छळ’ झालेल्या पीडितांचा उल्लेख केला होता. त्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. राहुल यांनी काश्मीरमधील आपल्या भाषणात बलात्कार झालेल्या काही महिलांचा उल्लेख केला होता. आम्ही त्यांना या महिलांचा तपशील मागवणारी नोटीस पाठवली होती आणि आता त्याबद्दल त्यांची चौकशी करू, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘महिलांचा लैंगिक छळ’ या त्यांच्या भारत जोडो यात्रेतील भाषणाबाबत दिल्ली पोलिसांच्या नोटीसला उत्तर दिले आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या नोटीसला 4 पानी उत्तर पाठवले आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी अदानींवरील माझ्या वक्तव्यामुळे असे होत आहे का? असा प्रश्नच आपल्या उत्तरात उपस्थित केला आहे. तसेच मी 45 दिवसांपूर्वी निवेदन दिले होते, त्यावर अचानक नोटीस देण्याची काय गरज? अशी विचारणा करत ही कारवाई ‘अभूतपूर्व’ असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण
राहुल गांधींकडून प्राथमिक उत्तर मिळाले आहे, परंतु त्यांच्या बाजूने कोणतीही माहिती सामायिक केलेली नसल्यामुळे तपास पुढे जाऊ शकेल, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी उघड केलेली बाब गंभीर असून पोलीस यंत्रणा संबंधित पीडितांची अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे, असे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हु•ा यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी यांनी काही दिवसांचा वेळ मागितला असून शक्मय तितक्मया लवकर सर्व आवश्यक माहिती शेअर करू, असा शब्द राहुल यांनी दिल्याचेही ते पुढे म्हणाले.
दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टची दखल घेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रश्नावली पाठवत त्यांच्याकडे लैंगिक छळाच्या तक्रारी घेऊन आलेल्या महिलांची माहिती देण्यास सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या श्रीनगर टप्प्यात महिलांचा अजूनही लैंगिक छळ होत असल्याचे मी ऐकले आहे, असे वक्तव्य केले होते. पोलिसांनी सदर महिलांची माहिती मागवून संबंधितांना सुरक्षा प्रदान करण्याचा विचार चालवल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेस-भाजपमध्ये ‘टिवटिवाट’
दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या नोटिशीला सविस्तर उत्तर देण्यासाठी राहुल यांनी 8-10 दिवसांचा अवधी मागितला आहे. याचदरम्यान काँग्रेसने सोशल मीडियावर ‘सावरकर समजला काय... नाव राहुल गांधी आहे’ असे ट्विट केले. काँग्रेसच्या या ट्विटला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रिट्विट करत ‘कृपया महान आत्मा वीर सावरकरांचा अपमान करू नका. मी हात जोडून विनंती करत आहे’ असे म्हटले आहे.
काय म्हणाले काँग्रेस नेते?
जयराम रमेश : दिल्ली पोलिसांना महिलांची तेवढीच काळजी होती, मग ते फेब्रुवारीत का आले नाहीत. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर 45 दिवसांनी दिल्ली पोलीस चौकशीसाठी येत आहेत. राहुल गांधी यांची कायदेशीर टीम कायद्यानुसार नोटीसला उत्तर देईल.
अशोक गेहलोत : गृह मंत्रालयाशिवाय आणि वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या निर्देशांशिवाय पोलीस राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचणे शक्मय नाही. संपूर्ण देश ही ‘कारस्थाने’ पाहत आहे. देश त्यांना माफ करणार नाही. आजची कारवाई अत्यंत गंभीर आहे.