For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधी आज प्रचारासाठी मंड्या, कोलारमध्ये

10:03 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधी आज प्रचारासाठी मंड्या  कोलारमध्ये
Advertisement

प्रियांका गांधींच्याही प्रचारासाठी तारखा निश्चित

Advertisement

बेंगळूर : सर्वच राजकीय पक्षातील नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत. दरम्यान बुधवारी मंड्या, कोलार येथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी निवडणूक प्रचाराचे बिगुल वाजवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठोपाठ काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचाही कर्नाटक दौरा सुरू झाला आहे. राहुल गांधींच्या राज्य दौऱ्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता  उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, राहुल गांधी बुधवारी मंड्या आणि कोलारला भेट देणार आहेत. दुपारी 12.30 वाजता बेंगळूरला आगमन झाल्यानंतर ते दुपारी मंड्या आणि नंतर कोलारमध्ये प्रचार करतील. तेथून ते दिल्लीला प्रयाण करतील. नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील राज्यात प्रचारासाठी तारखा निश्चित केल्या आहेत. त्यांच्यावर इतर राज्यांमध्ये प्रचाराचा ताण आहे. त्यांनी दिलेल्या तारखांचा ताळमेळ राखून आम्ही प्रचराचे नियोजन करत आहोत, असेही शिवकुमार यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.