For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उमर खालिदसोबत राहुल गांधींची तुलना

06:19 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
उमर खालिदसोबत राहुल गांधींची तुलना
Advertisement

भाजप कार्यालयाबाहेर झळकली पोस्टर्स : अराजकतेची पद्धत एक असल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील एआय समिटमध्ये काँग्रेस नेत्यांनी घातलेल्या गोंधळाकरता भाजपने पुन्हा एकदा राहुल गांधींना जबाबदार ठरविले आहे. भाजपने राहुल गांधींची तुलना 2020 च्या दंगलीतील आरोपी उमर खालिदसोबत करत पोस्टर्स झळकविली आहेत. या पोस्टरवर ‘अराजकतेची पद्धत एक, केवळ देशविरोधी चेहरे बदलत राहतात’ या आशयाचा मजकूर आहे.

Advertisement

या पोस्टरमध्ये एका बाजूला उमर खालिद असून त्याला सीएए विरोधात निदर्शने करताना दाखविण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी असू त्यांच्यासमोर शर्टलेस काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रतिमा असून ते एआय समिटला विरोध करत आहेत. हे पोस्टर भाजपचे प्रवक्ते आर.पी. सिंह यांनी जारी केले आहे.

एआय समिटमध्ये शर्ट काढून निदर्शने केल्याप्रकरणी आतापर्यंत युवक काँग्रेसच्या 11 नेत्यांना अटक झाली आहे. गुरुवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी हिमाचल प्रदेशातून तीन नेत्यांना अटक केली आहे. तर तत्पूर्वी बुधवारी हिमाचल आणि दिल्ली पोलिसांमध्ये युवक काँग्रेस नेत्यांच्या अटकेवरून शाब्दिक झटापट झाली होती. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब याला दिल्लीच्या न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. चिब याला मंगळवारी अटक करण्यात आली होती.

दिल्लीतील भारत मंडपम येथे युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 20 फेब्रुवारी रोजी भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात निदर्शन पेली होती. यात 10 हून अधिक कार्यकर्त्यांनी हातात टी-शर्ट घेत घोषणाबाजी केली होती. या टी-शर्टवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे छायाचित्र होते, त्यावर ‘पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड’ असे लिहिलेले होते.

Advertisement
Tags :

.