For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rahul Gandhi: शेवटच्या रांगेवरुन राजकारण, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, काय आहे प्रकरण?

12:56 PM Aug 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
rahul gandhi  शेवटच्या रांगेवरुन राजकारण  आरोप प्रत्यारोपांच्या फैरी  काय आहे प्रकरण
Advertisement

भाजप आणि शिवसेना ठाकरे गटातील शाब्दिक हल्ले सुरू आहेत

Advertisement

By : विश्वास दिवे

कोल्हापूर : राजकारणाच्या पटावर कधी कोणती चाल कोणत्या पद्धतीने खेळली जाईल, हे सांगता येत नाही. एखादी साधीशी दिसणारी घटना कधी मोठा राजकीय वाद निर्माण करू शकते, याचे ताजे उदाहरण म्हणजे राहुल गांधी यांच्या डिनर बैठकीतील उद्धव ठाकरे यांचे आसन. ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

Advertisement

राहुल गांधी यांच्या डिनर बैठकीत उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गटातील शाब्दिक हल्ले सुरू आहेत. भाजपने या घटनेचा उपयोग ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी केला. तर ठाकरे गटाने याला तांत्रिक कारण देत भाजपचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना एनडीएसोबत असताना पहिल्या रांगेत स्थान मिळत होते, याची आठवण करून देत काँग्रेसच्या आघाडीत त्यांचा अपमान झाल्याचा आरोप केला आहे. उद्धव यांच्या दिल्लीसमोर न झुकण्याच्या भूमिकेला लक्ष्य करत त्यांच्या स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उद्धव यांनी बाळासाहेबांचे आदर्श सोडल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

भाजपने बैठकीचा क्रीनशॉट शेअर करत स्वाभिमान शोधा’ अशी कॅप्शन लिहून हा मुद्दा सोशल मीडियावर तापवला. यातून आगामी निवडणुकांपूर्वी ठाकरे गट आणि काँग्रेसमधील संबध ताणले जावेत, अशी महायुतीची रणनीती आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

राऊत यांनी स्पष्ट केले की, उद्धव यांना पुढच्या रांगेत स्थान देण्यात आले होते. परंतु, प्रेझेंटेशन क्रीन चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी ते मागे बसले. आदित्य यांनीही बैठकीतील घरगुती वातावरण आणि स्वत:च्या निर्णयाचा हवाला देत भाजपच्या टीकेला निरुपयोगी ठरवले. तर निवडणूक आयोगाच्या कथित मतचोरीच्या मुद्यावर राहुल गांधी यांच्या सादरीकरणाला समर्थन देत त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

2022 च्या बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी ही भाजपविरोधी रणनीतीचा भाग आहे. मात्र, अशा घटनांमुळे आघाडीतील नेत्यांमधील दुरावा निर्माण होऊ शकतो. भाजपने या संधीचा फायदा घेत हल्ला चढवला आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाने या प्रकरणाला कमी लेखत निवडणूक आयोगाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आसनाचा वाद हा केवळ एक लहानशी घटना नसून, महाराष्ट्रातील राजकीय रणनीती आणि प्रचाराचा भाग आहे. भाजपने याचा उपयोग ठाकरे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी केला, तर शिवसेनेने आघाडीतील एकजुटीवर भर देत पलटवार केला. आगामी निवडणुकांपूर्वी असे वाद राजकीय चर्चेला तापवत राहतील, परंतु त्यांचा मतदारांवर कितपत परिणाम होईल, हे येणारा काळच ठरवेल.

Advertisement
Tags :

.