कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालवणच्या राहुल चव्हाणची ''रिपब्लिक डे कॅम्प परेड'' साठी निवड

03:55 PM Dec 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

पंतप्रधानांच्या समोर दिल्लीला परेड करण्याची संधी

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

स . का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाअंतर्गत एनसीसी ट्रेनिंग घेत असलेला तसेच टी वाय बी कॉम या वर्गात शिक्षण घेत असणारा एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर राहुल चव्हाणचे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे होणाऱ्या होणाऱ्या RDC (रिपब्लिक डे कॅम्प) कॅम्पसाठी निवड झाली असल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन होणार आहे. यानिमित्त दिल्ली येथे संचलन केले जाते . प्रत्येक राज्याचे रथ व वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी सादर केले जातात. भारतातील आर्मी ,नेव्ही , एअर फोर्समधील जवान परेड संचलनसाठी उपस्थित असतात . याबरोबरच भारतातील प्रत्येक राज्यातून काही एनसीसी कॅडेट यांची निवड केली जाते .यापैकीच महाराष्ट्रातूनमालवण येथील राहुल उदय चव्हाणची निवड झालेली आहे. ही सिंधुदुर्ग कॉलेज साठी ऐतिहासिक घटना आहे. आजपर्यंत कॉलेजच्या इतिहासामध्ये असा क्षण पाहायला मिळाला नव्हता. मात्र, राहुल याने एन . सी ,सी च्या NCC माध्यमातून सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे, मालवणचे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचविले आहे.मालवणच्या नावलौकिकामध्ये राहुलने आणखीन भर घातलेली आहे. सध्या एनसीसीच्या तिसऱ्या वर्षाला त्याचा प्रवेश आहे तसेच तो एनसीसीचा सीनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करतो, 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग या बटालियन मार्फत त्याचे सिलेक्शन झालेले आहे . सलग तीन महिने, दहा- दहा दिवसाचे कॅम्प आर्मीकडून आयोजित केले जातात त्या प्रत्येक कॅम्पमध्ये त्याचे सिलेक्शन झालेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार एनसीसीचे विद्यार्थी आहेत त्यापैकी हा एकमेव विद्यार्थी आहे ज्याचे दिल्लीला सिलेक्शन झालेले आहे. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल , तसेच सुभेदार मेजर दिनेश गेडाम आणि इतर आर्मी ऑफिसर यांनी राहुलचे ट्रेनिंग घेतले. लेफ्टनंट प्राध्यापक एमआर खोत सिंधुदुर्ग कॉलेज यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. दिल्लीसाठी सिलेक्शन होणे म्हणजे अत्यंत कठीण बाब आहे आणि ते सर्व अडथळे पार करून त्याने ही मजल मारलेली आहे आणि ही एक सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कौतुकस्पद बाब आहे .असे कर्नल दीपक दयाल (उत्तर प्रदेश)यांनी व्यक्त केले.

एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत, सिंधुदुर्ग कॉलेज मालवणचे प्राचार्य डॉ .शिवराम ठाकूर यांनी फोनवरून राहुलचे अभिनंदन केले. त्याचबरोबर संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर,, सीडीसी अध्यक्ष समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुषे संस्थेचे सर्व संचालक मंडळ साईनाथ चव्हाण , संदेश कोयंडे , प्रमोद ओरसकर, डॉक्टर झाटये, विजय केनवडेकर , भाऊ सामंत, महादेव पाटकर व इतर पदाधिकारी या सर्वांनी राहुलचे अभिनंदन केले. कॉलेजचे प्राध्यापक, एनसीसी चे सर्व कॅडेट्स, मालवण तालुका पोलीस प्रमुख कोल्हे , मालवण तहसीलदार झाल्टे मॅडम यांनी राहुलचे अभिनंदन केले. आणि मालवण साठी ही एक कौतुकास्पद बाब आहे असा उल्लेख केला.58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम यांनी राहुलचे कौतुक केले. कॉलेजमधील इतिहासातील ही एक ऐतिहासिक घटना आहे जी कायमस्वरूपी कॉलेजच्या आणि मालवणच्या इतिहासामध्ये नोंद राहील अशा प्रकारचे उदगार कॉलेजचे माजी एनसीसी अधिकारी गिरसागर सर ,काटकर सर, उज्वला सावंत मॅडम यांनी काढले आणि राहुलचे अभिनंदन केले.

 

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # malvan #
Next Article