For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime | साताऱ्याच्या पिंपळवाडीत जुन्या घराच्या जागेवरून राडा; फाळके कुटुंबातील दोन गट आपसात भिडले

03:58 PM Mar 26, 2026 IST | NEETA POTDAR
satara crime   साताऱ्याच्या पिंपळवाडीत जुन्या घराच्या जागेवरून राडा  फाळके कुटुंबातील दोन गट आपसात भिडले
Advertisement

                पिंपळवाडीत घराच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

Advertisement

सातारा -पिंपळवाडी धावडशी येथे जुन्या गावठाणच्या जागेवर घराच्या बांधकामाच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद निर्माण होऊन एकमेकांना मारहाणीची घटना घडली आहे. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे.

बजरंग बाबुराब फाळके यांनीप्रवीण परशुराम फाळके (वय ३४,रा. पिंपळवाडी, ता. सातारा) यांनादगड मारला. यावेळी प्रवीण फाळके याचे वडील येथे आल्यावर सौरभफाळके याने वडिलांना धरून दोघांना बेदम मारहाण केली. विजय बाबुराव फाळके, अमीर राजेंद्र फाळके, हर्षद बजरंग फाळके, बजरंग बाबुराव फाळके व सौरभ विजय फाळके यांच्याविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ विजय फाळके (वय १९) याच्या फिर्यादीवरून प्रवीण परशुराम फाळके, प्रकाश तात्या इंगळे, रुक्मिणी प्रकाश इंगळे, परशुराम दगडू फाळके, विजया परशुराम फाळके, मच्छिंद्र धर्मु फाळके (सर्व रा. पिंपळवाडी, सातारा) यांच्याबर गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.