For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime | सोलापुरात जुन्या वादातून 'राडा'! हॉकी स्टिक आणि रॉडने एकाच कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण

05:26 PM Apr 28, 2026 IST | NEETA POTDAR
solapur crime   सोलापुरात जुन्या वादातून  राडा   हॉकी स्टिक आणि रॉडने एकाच कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण
Advertisement

                                सोलापुरात जुन्या वादातून तिघांवर हल्ला

Advertisement

सोलापूर : मागील भांडणाचा रागमनात धरुन हॉकी स्टीक व रॉडने तिघाजणांना मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवार, २७ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली. जखमीवर सोलापुरातील न सिव्हिल हॉस्पटल येथे उपचार सुरु ना आहेत.

सागर कट्याप्पा गायकवाड (वय २७), कोमल कट्याप्पा श्र गायकवाड (वय २९), महानंदा कट्याप्पा गायकवाड (वय ५५ रा. बडकबाळ ता. द. सोलापूर) असे मारहाणीत जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. बडकबाळ येथे मागील भांडणाचा राग मनात धरुन त गायकवाड कुटुंबातील तिघांना व सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पिरसाहब बाघमारे, कट्याप्पा वाघमारे, प्रेमा बाघमारे व इतर सातजणांनी मिळून हॉकी स्टीक, रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. य या मारहाणीत सागर गायकबाड डे याच्या तोंडास जखम व सर्वांगास मुक्कामार लागला.

Advertisement

Advertisement
Tags :

.