Islampur News | नवेखेडमध्ये पूर्ववैमनस्यातून 'राडा'; तरुणाला पाईपने बेदम मारहाण करत फोडले डोके!
02:35 PM Apr 30, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
ईश्वरपूरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर पाईपने हल्ला
Advertisement
ईश्वरपूर : नवेखेड येथे पूर्ववैमनस्यातून तिघांनी तौसिफ इसरार धानविलकर (२७ रा. पेठलॉड बसाहत नवेखेड) या तरुणास पाईपने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री घडली.
अरिफ मूसा धानविलकर वेलकर (३५), (३५), अशरफ खलिल चिखलकर (२४), नईम ईसा धानविलकर (३२ सर्व रा. नवेखेड), अशी संशयीतांची नावे आहेत. सोमवारी रात्री बाबा पान शॉप शेजारी हा प्रकार घडला. तौसिफ व आरोपी यांच्यात जुनावाद आहे.
सोमवारी तौसिफ यास बोलावूनघेवून तु आम्हास खुन्नस देतोस, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. दरम्यान आरिफने प्लॉस्टिकच्या पाईपने चिखलकर याने मारून जखमी केले. दरम्यान नईम याने त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी तौसिफ याने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.
Advertisement
Advertisement