राफेलला आकाशात मिळणार ‘बॉडीगार्ड’
फ्रान्सची मोठी घोषणा
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सचे लढाऊ विमान राफेल हे अनेक देशांच्या वायुदलाच्या ताफ्यात सामील आहे. भारतापासुन कतारपर्यंत अनेक देशांनी फ्रान्सला राफेल लढाऊ विमानांसाठी ऑर्डर दिली आहे. राफेल तयार करणारी कंपनी डसॉल्ट एव्हिएशन आता राफेल मल्टी रोल जेटची पुढील पिढी एफ5 तयार करत असून जे आकाशातच ‘बॉडीगार्ड’ने युक्त असणार आहे. आकाशात राफेलसोबत एक मानवरहित ड्रोनने उ•ाण करावे अशी फ्रेंच कंपनीची योजना आहे. हा ड्रोन राफेलच्या वैमानिकाच्या नियंत्रणात असेल आणि शत्रूला नष्ट करण्यास मदत करणार आहे.
फ्रान्सचे संरक्षणमंत्री सेबेस्टिअन लेकोर्नू यांनी सेंट डिजिअर वायुतळावर या ड्रोनसंबंधी घोषणा केली आहे. हा ड्रोन पहिल्या एनयुरोऑन युसीएव्ही प्रोजेक्टच्या आधारावर तयार केला जाणार आहे. या ड्रोनचा परीक्षणादरम्यान वैमानिकयुक्त लढाऊ विमानांसोबत यापूर्वीच वापर केला जात आहे. हा रडारच्या तावडीत न सापडणारा लढाऊ ड्रोन 2033 पर्यंत फ्रेंच एअरफोर्सला तांत्रिक आणि मोहिमात्मक आघाडी मिळवून देणार आहे. हा ड्रोन अनेक प्रकारच्या क्षमतांनी युक्त असेल. या ड्रोनचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही आणि राफेलला पूर असणार आहे. हा ड्रोन आणि राफेल लढाऊ विमान मिळून युद्धभूमीवर शत्रूला धडा शिकवतील असे डसॉल्ट कंपनीचे सीईओ एरिक टॅप्पियर यांनी सांगितले आहे.
ड्रोन अत्यंत खास
या युएव्हीच्या आतच एक अंतर्गत पेलोड असणार आहे. ऑटोनॉमस कंट्रोल आणि राफेलचा वैमानिक सहजपणे या ड्रोनचे उ•ाण घडवून आणू शकणार आहे. हा ड्रोन अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असेल आणि भविष्यात उद्भवणाऱ्या धोक्यांना विचारात घेत तो पुढील काळात विकसित केला जाऊ शकणार आहे असे कंपनीने म्हटले आहे. फ्रान्स एक अण्वस्त्रसज्ज देश असून तो आता राफेलच्या मदतीने आण्विक प्रतिरोधक क्षमता बाळगून आहे.
भविष्यात किलर ड्रोन आण्विक मोहिमेदरम्यान आकाशात येणारे धोके दूर करेल आणि यानंतर राफेल लढाऊ विमान सहजपणे स्वत:च्या लक्ष्याचा वेध घेऊ शकणार आहे. राफेलचे एफ-5 वर्जन नव्या ड्रोनसोबत 2060 पर्यंत फ्रान्सच्या वायुदलात कार्यरत राहणार आहे. राफेलच्या एफ-5 वर्जनसाठी प्रारंभिक अध्ययन झाले असून 2026-27 मध्ये याचा पूर्ण विकास सुरू होणार आहे. आगामी काळात हा राफेल नक्या ड्रोनसोबत उड्डाण करू शकणार आहे. आगामी काळात फ्रान्स राफेलला एएसएन4जीने युक्त करणार आहे. हे फ्रान्सच्या वायुदलाचे स्टँडऑफ न्युक्लियर वेपन आहे.
भारताला होणार लाभ
या नव्या राफेलमध्ये नवे क्रूझ क्षेपणास्त्र, एअर-टू-एअर क्षेपणास्त्र आणि नवे युद्धनौकाविरोधी हायरपरसोनिक क्षेपणास्त्र जोडण्याचीही योजना आहे. राफेल एफ-5 वर्जन शत्रूच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला मुख्यत्वे लक्ष्य करणार आहे. भारत 100 हून अधिक लढाऊ विमाने खरेदी करण्यास इच्छुक आहे. यापूर्वी भारतीय वायुदलात राफेलचा समावेश करण्यात आला आहे. भारत आता नौदलासाठी राफेल विमाने खरेदी करणार आहे. अशास्थितीत भविष्यात भारताला ड्रोनने युक्त राफेलची ऑफर मिळू शकते.