For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवणात भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट

03:15 PM Dec 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मालवणात भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट
Advertisement

वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर संस्था आणि मालवणातील प्राणीमित्रांचा पुढाकार

Advertisement

मालवण | प्रतिनिधी 
वाइल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्ग यांच्यावतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट बसवण्याचा उपक्रम मालवण शहरात सुरु करण्यात आला. शहरातील फोवकांडा पिंपळ व बंदर जेटी इथल्या भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावून व ॲन्टी रॅबीज इंजेक्शन देऊन हा उपक्रम सुरु करण्यात आला. भटक्या जनावरांपासून अपघात घडू नये तसेच मुक्या प्राण्यांचे जीव वाचावेत या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यावेळी वाईल्ड लाईफ सेस्क्यूअर संस्थेचे अध्यक्ष विष्णू मसके, डाॅ प्रसाद धुमक, सल्लागार सौ. शिल्पा यतीन खोत, संदीप चिऊलकर, दीपक दुतोंडकर, कृष्णा कदम, प्रविण सरकारे, पर्यावरण प्रेमी प्राणीमित्र आनंद बांबार्डेकर व स्वप्निल परुळेकर, अंकिता मयेकर, मनिषा पारकर, शांती तोंडवळकर, महेश वालीकर उपस्थित होते. आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून शहरात सर्वत्र व्यापक प्रमाणावर कुत्र्यांना ॲन्टी रॅबीज इंजेक्शन व कुत्रे निर्बिजीकरण करण्याचा संकल्प असून यासाठी इतर संस्था किंवाप्राणीमित्र यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विष्णू मसके, प्रसाद धुमक व सल्लागार शिल्पा यतीन खोत यांनी केले आहे. व यासाठी 9422436244 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.