राधिका करतेय अभिनेत्याला डेट
बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदान सध्या चर्चेत आहे. राधिका ही ‘कॉल मी बे’ चित्रपटातील अभिनेता विहान समतला डेट करत आहे. दोघांनीही स्वत:च्या रिलेशनशिपची वाच्यता अद्याप केलेली नाही. परंतु दोघेही अनेकदा एकत्र दिसून येत आहेत. अलिकडेच दोघेही मुंबईतील एका मॉलमध्ये एकत्र दिसून आले आहेत.
विहानसोबतच्या रिलेशनशिपविषयी जेव्हा मला कॉमेंट करायची असेल त्यावेळी मी ती करेन. सध्यातरी माझे खासगी आयुष्य खासगीच राखू इच्छिते, असे राधिकाने म्हटले आहे. राधिका ही विहानचा चित्रपट सीटीआरएलच्या सक्सेस पार्टीत सामील झाली होती, या चित्रपटात अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. राधिका आणि विहान दिल्लीहून बालीसाठीच्या फ्लाइटमध्ये एकत्र दिसून आले होते. विहान हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित सीरिज ‘द रॉयल्स’च्या यशाचा आनंद घेत आहे. या सीरिजमध्ये भूमी पेडणेकर, ईशान खट्टर, साक्षी तंवर, जीनत अमान, डिनो मोरिया, मिलिंद सोमण, लिसा मिश्रा, चंकी पांडे आणि नोरा फतेही हे कलाकार दिसून आले होते.