दिग्दर्शनाच्या क्षेत्रात राधिका आपटेचे पदार्पण
स्वत:च्या अभिनयासाठी प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे लवकरच ‘कोट्या’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. राधिका आपटेने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय सादर करत लोकांची मने जिंकली आहेत. तिने मागील काही वर्षांमध्ये ‘पॅडमॅन’, ‘अंधाधुन’, ‘मोनिका’ आणि ‘माय डार्लिंग’ यासारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता राधिका अॅक्शन-फँटेसी चित्रपटासोबत दिग्दर्शनात पाऊल ठेवणार आहे.
राधिकाचा चित्रपट ‘कोट्या’ एक हिंदी/मराठी अॅक्शन फॅन्टेसीं आहे. यात एका स्थलांतरित युवकाची कहाणी दाखविण्यात आली आहे. नायक एक उसतोड करणारा मजूर आहे. बळजबरीच्या वैद्यकीय प्रक्रियेनंतर या युवकाला काही शक्ती प्राप्त होतात. यानंतर तो या शक्तींचा वापर स्वत:च्या परिवाराचे कर्ज फेडण्यासाठी करतो. या चित्रपटाची निर्मिती विक्रमादित्य मोटवानी करत आहेत.
राधिका अलिकडेच ‘सिस्टर मिडनाइट’मध्ये दिसून आली होती. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राधिकाने यात अरेंज मॅरेज करण्यास भाग पाडलेल्या महिलेची भूमिका साकारली होती. राधिकाने 2012 मध्ये विवाह केला होता, तर मागील वर्षी तिने मुलाला जन्म दिला होता.