‘साली मोहब्बत’मध्ये राधिका आपटे
चित्रपटाच्या नावात झाला बदल
फॅशन डिझाइनिंगच्या जगतातील लोकप्रिय चेहरा ठरलेला मनीष मल्होत्रा आता चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. मनीष मल्होत्रा स्वत:चे प्रॉडक्शन हाउस ‘स्टेज 5’सोबत चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव जाहीर झाले आहे. या चित्रपटाचे नाव ‘ट्रेन फ्रॉम छपरौला’ असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते, परंतु आता नावात बदल करण्यात आला आहे.
स्टेज 5 प्रॉडक्शन्सकडून चित्रपटाचे नाव ‘साली मोहब्बत’ असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटात राधिका आपटे, दिव्येंदु शर्मा, अंशुमान पुष्कर, सौरसेनी मैत्रा, शरत सक्सेना आणि अनुराग कश्यप हे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन टिस्का चोप्रा करणार आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीत ज्योति देशपांडे, दिनेश मल्होत्रा आणि मनीष मल्होत्रा, जियो स्टुडिओ यांचा सहभाग असणार आहे.
मनीष मल्होत्राकडून याचबरोबर आणखी तीन चित्रपट निर्माण केले जाणार आहेत. यातील एका चित्रपटाद्वारे झीनत अमान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहेत.