For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राधिका अन् कीर्ति एकत्र झळकणार

06:28 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
राधिका अन् कीर्ति एकत्र झळकणार
Advertisement

‘अक्का’ सीरिजमध्ये करणार काम

Advertisement

नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वी ‘द रेल्वे मेन’ ही सीरिज प्रदर्शित झाली असून त्याला काही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता यशराज फिल्म्स स्वत:ची पुढील सीरिज ‘अक्का’च्या  तयारीत आहे. याकरता यशराज फिल्म्स आणि नेटफ्लिक्स यांच्यात करार झाला आहे. द रेल्वे मेन ही सीरिज भोपाळ गॅस गळती प्रकरणावर आधारित होती. यात के.के. मेनन, दिव्येंदु शर्मा, आर. माधवन आणि बाबिल खान मुख्य भूमिकेत होते.

यशराज फिल्म्सच्या नव्या सीरिजमध्ये राधिका आपटे आणि दक्षिणेतील अभिनेत्री कीर्ति सुरेश मुख्य भूमिका साकारणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन धर्मराज शेट्टी करणारअसून ही एक पीरियड थ्रिलर धाटणीची असणार आहे. कीर्ति सुरेश आणि राधिका या अत्यंत गुणवान अभिनेत्री आहेत. कीर्ति सुरेश आगामी काळात काही हिंदी चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. कीर्ति ही दक्षिणेतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Advertisement

या सीरिजसाठी धर्मराज शेट्टी यांची निवड आदित्य चोप्रा यांनीच केली आहे. ‘अक्का’ सीरिजसाठीचे शेट्टी यांचे व्हिजन विचारात घेत चोप्रा यांनी हा निर्णय घेतला आहे. या सीरिजबद्दलचे गूढ कायम ठेवण्यासाठी प्रत्येक तपशील सध्या गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.