अक्का’मध्ये राधिका अन् कीर्ति
ओटीटीवर प्रदर्शित होणार सीरिज
कीर्ति सुरेश आणि राधिका आपटे यांची मुख्य भूमिका असलेली ‘अक्का’ ही आगामी पीरियड थ्रिलर वेबसीरिज आहे. कीर्तिची ‘अक्का’ ही सीरिज 30 ऑक्टोबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचा फर्स्ट लुक निर्मात्यांनी यापूर्वीच जारी केला आहे.
पीरियड थ्रिलर ‘अक्का’ची कहाणी 1980 च्या दशकातील दक्षिण भारतीय पेरनुरुवर आधारित असून ते एक कठोर मातृसत्तात्मक समाजामध्ये वाटचाल करत असते. शहरात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक शक्ती महिलांच्या हातात आहे. या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी ‘अक्का’ नावाचा एक खास महिलांचा समूह असून तो पेरनुरुमध्ये सोन्याच्या तस्करीला नियंत्रित करत असतो.
शक्तिशाली महिलांच्या नेतृत्वात ‘अक्का’ भय अन् निष्ठेच्या बळावर राज्य करत असते. समुहाकडे महिलांचे एक असे सैन्य आहे, जे लढाई आणि टोळीची दौलत तसेच सन्मानाचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षित आहे. पेरनुरुमध्ये एक रहस्यमय महिला दाखल झाल्यावर समुहाच्या साम्राज्याला धोका निर्माण होतो. समुहाला थेट सामोरे जाण्याऐवजी ही महिला त्यातील अंतर्गत कमजोरी आणि फूटचा फायदा उचलण्यास सुरुवात करते.
कीर्ति आणि राधिका तसेच तन्वी आझमी यांची महत्त्वाची भूमिका असलेली ‘अक्का’ सीरिज वायआरएफ एंटरटेन्मेंटने निर्माण केली आहे. तर याचे दिग्दर्शन धर्मराज शेट्टीने पेले आहे.
