दुर्मिळ साळींदर वन्यप्राण्यांच्या शिकारी प्रकरणी एकाला अटक! तिघांचा सहभाग
राधानगरी प्रादेशिक वन विभागाची कारवाई, संशयिताला तीन दिवसांची वनकोठडी
राधानगरी/प्रतिनिधी
सुळबी, ता, राधानगरी येथे दुर्मीळ साळींदर (हायस्ट्रिक्स इंडिका) या वन्यप्राणीची शिकार केल्या प्रकरणी निष्नप, ता, भुदरगड येथील सनी विश्वास राऊळ (वय वर्ष24) या संशयित आरोपीला वनविभागाने अटक केली आहे, त्याला राधानगरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी हजर केले असता तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी राधानगरी प्रादेशिक वनविभागाकडून अधिक माहिती की, 13 सप्टेंबर रोजी सुळबी ता, राधानगरी येथील जंगलात संशयित आरोपी सनी राऊळ याने आपल्या सहकार्याच्या मदतीने दुर्मीळ साळींदर या प्राण्यांची शिकार केली असल्याची कबुली दिली आहे,
संशयित आरोपी सनी याने दिलेल्या माहितीनुसार प्रदीप कृष्णा राऊळ(वय वर्ष33)रा, निष्णप, सचिन कृष्णा राऊळ(वय वर्ष40)रा, निष्णप व गणेश उर्फ संतोष निवृत्ती बेलेकर(वय वर्ष 32)रा, करडवाडी ता, भुदरगड यांची चौकशी केली असता या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे त्यामुळे या तिघांना ताब्यात घेतले आहे, या शिकारी प्रकरणी आणखीन गुन्हे घडल्याची शक्यता वनविभागाने केली आहे.
या बाबतचा अधिक तपास उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद, सहा, उपवनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल विशाल पाटील, वनपाल एस बी भाट,वनरक्षक एम, डी अंगज, जे एस साबळे, ओ एस संकपाळ हे करत आहेत