महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राधानगरी तालुक्यात 1 लाख 67 हजार 422 एकूण मतदार!

05:26 PM Mar 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

दिव्यांग मतदार 2718, 85 वर्षावरील 2189 इतके मतदार, युवक-युवती 4466 नवे मतदार

राधानगरी/महेश तिरवडे

संपूर्ण देशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली असून, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतील राधानगरी तालुक्यात 2019सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 3987 मतदारांची नोंद झाली आहे ,तर 4466 इतक्या नवं युवक युवतीची मतदार संख्या वाढली आहे, असे एकूण 8453 मतदान वाढले आहे.

Advertisement

2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत पुरुष 86064 व महिला 77061 असे एकूण 163125 मतदार संख्या इतकी होती तर ,23 जानेवारी 2024 नवीन मतदार यादी प्रसिद्ध झाली त्यानुसार 25 ऑक्टोबर2023 ते12 फेब्रुवारी 2024 या मतदार यादीत 87909 पुरुष, 79508 महिला व तृतीयपंथी 5 असे एकूण 167422 मतदारांची नोंद करण्यात आली आहे, सध्या 5 एप्रिल पर्यत आणखीन मतदारांची नोंद करण्यात येणार असून त्यांनतर एकूण मतदारांची आकडेवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत, राधानगरी तालुक्यात राजकीय दृष्टया महत्वपूर्ण संवेदनशील गावे सरवडे, राधानगरी , म्हासुरली,तळाशी,फेजीवडे, तुरंबे, कसबा तारळे ही गावे जाहीर करण्यात आली आहेत.

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे,तालुक्यात 25 क्षेत्रीय अधिकारी व प्रत्येक नियुक्त अधिकाऱ्यांच्याकडे 6 ते 13 मतदान केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे राधानगरी तालुक्यात 205 एकूण मतदान केंद्र असून मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती अतिसहायक निवडणूक निर्णय अधिकारी (कोल्हापूर लोकसभा)राधानगरी विधानसभा मतदार संघ, अनिता देशमुख यांनी सांगितले आहे

 

Advertisement
Tags :
#voterLacks votersLoksabha constituencyRadhanagariRadhanagari Talukatarun bharat news
Next Article