For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Radhanagari Hasane: फेसाळलेले पाणी अन् हिरवागार झाडी, राधानगरीतील हसणे प्रकल्पाची पर्यटकांना साद

01:08 PM Jun 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
radhanagari hasane  फेसाळलेले पाणी अन् हिरवागार झाडी  राधानगरीतील हसणे प्रकल्पाची पर्यटकांना साद
Advertisement

दाट धुक्यातून वाट शोधत घाट पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

Advertisement

By : महेश तिरवडे

राधानगरी : निपाणी-देवगड राज्यमार्गावरील राधानगरीपासून 25 किमी अंतरावर राधानगरी अभयारण्यातील हसणे येथील धबधबा गेल्या काही दिवसांपासून प्रवाहित झाला आहे. सध्या धरण क्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे हा धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. त्यामुळे या घनदाट अभयारण्यात, हुडहुडी भरवणारी थंडी आणि कोसळणाऱ्या मुसळधार पावसात, दाट धुक्यातून वाट शोधत घाट पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

Advertisement

पावसाचे आगर असलेल्या या ठिकाणी हसणे येथील लघु पाटबंधारे धरण भरल्यानंतर प्रकल्पावरून ओसंडत वाहणारा धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनला आहे. हसणे गावापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेला हा नयनरम्य धबधबा आणि इतर लहान-मोठ्या डोंगररांगांमधून कोसळणारे धबधबे, धरणाचा बॅक वॉटर परिसर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.

पावसाच्या सरींमध्ये आणि दाट धुक्यात चिंब भिजून, मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांतून पर्यटक या ठिकाणी पोहोचत आहेत. निसर्गाच्या या अप्रतिम दृश्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. राधानगरी अभयारण्यातील हा धबधबा सध्या कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण आणि आसपासच्या परिसरातील पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे.

Advertisement
Tags :

.