जिह्यातील पहिले संपर्क कार्यालय राधानगरीत सुरू करणार, कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी निवडून द्या- छ. शाहू महाराज
राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी, शेती, इतर विकासासाठी सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून मला निवडून द्यावे ,राधानगरीकरांचे व आमचे नाते घट्ट असून विकासासाठी कोणतेही कसूर कमी केली जाणार नाही,तसेच कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मला निवडून द्या, लवकरच जिह्यातील पहिले आपले संपर्क कार्यालय राधानगरीतच सुरू करणार असल्याचे प्रतिपादन छ, शाहू महाराज यांनी केले, ते फेजीवडे येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते, स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच बशीर राऊत यांनी केले.
छ, शाहू महाराज म्हणाले की,छ, शाहू महाराज यांचे राधानगरी तालुक्यातील जनतेशी अतूट नाते आहे,राजांनी त्यांच्या काळात केलेल्या अजोड कामगिरीमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांना आदराचे स्थान आहे त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन राधानगरी तालुक्यातून मला वाढता पाठींबा मिळत असून सर्व कष्टकरी, शेतकरी जनतेचे हित लक्षात घेऊन जिह्यातील विकास कामावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे म्हणाले की महाराजांचे फेजीवडे गावावर खूप प्रेम असून आजवर समाजसेवेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप,वाड्यावस्त्यावरील कुटूंबाना मदत, पूरग्रस्तांना मदत, आदी अनेक उपक्रम राबविले आहेत, तसेच जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील म्हणाले छ, शाहू महाराज व राधानगरीचे नाते हे दृढ असून सर्व समाजातील घटकांनी पक्ष , गट तट बाजूला ठेवून तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन महाराजाना लोकसभेत पाठवूया, असे आवाहन केले, यावेळी माजी जी प सदस्य शिवानंद माळी, जनतादलाचे वसंतराव पाटील(कंथेवाडी कर)आदींनी आपले मनोगत व्यक्त केली.
छ, शाहू महाराज यांच्या संपर्क द्रौयात राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवड, पडसाळी, या गावांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना पाठींबा दिला असून या गावातून 100 टक्के मतदान देण्याचा निर्णय या गावांनी घेतला आहे,तसेच राधानगरी व फेजीवडे येथील सर्व मुस्लिम बांधवांनी छ, शाहू महाराज यांना पाठिंबा दिला असून जादा मताधिक्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
या मेळाव्यास गोकुळ संचालक अभिजित तायशेटे,माजी जी प सदस्य शिवानंद माळी, जिल्हा महिला अध्यक्ष सुप्रिया साळोखे, पी डी धुंदरे, सुधाकर साळोखे, रमेश पाटील, दादासो सांगावकर,वसंतराव पाटील(कंथेवाडीकर), संजय माळकर, चंद्रकांत चौगले,उत्तम पाटील, सुरेश चौगले, नंदू राठोड,राकेश केरकर,सरपंच प्रतिभा कासार, माजी सरपंच फारुख नावळेकर,बशीर राऊत, इकबाल कलोट, गौस तांबोळी, शब्बीर आंबर्डेकर, वसीम कलोट,गणी चोचे, अजीम चोचे, मदन पाटील, सलीम नावळेकर, मारुती कांबळे, कृषीकेश टेपुगडे, तानाजी जाधव यांच्यासह आजी माजी ग्रा प सदस्य व विविध संस्थेचे पदाधिकारी,महिला या कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित होते.