For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Radhanagri Dam दमदार पावसाने राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ धरण ४१.२९ टक्के भरले...

11:55 PM Jul 05, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
radhanagri dam दमदार पावसाने राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ धरण ४१ २९ टक्के भरले
Advertisement

राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून धरण आता 41.29 टक्के भरले आहे. गेल्या आठवड्यात अवघे 16 टक्के भरलेले धरण अवघ्या पाच दिवसांत 41.29 टक्क्यांवर पोहोचल्याने शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दाजीपूरसह तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून परिसरातील ओढे, नाले आणि लहान धबधबेही प्रवाहित झाले आहेत. पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने खरीप हंगामाबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
सध्या राधानगरी धरणाची पाणीपातळी 313.25 फूट असून धरणात 3,499.84 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात एक जून ते आजतागायत 979 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आज दिवसभरात 118 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
दरम्यान, धरणातून भोगावती नदीपात्रात अद्याप कोणताही विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. धरणाचे सर्व्हिस गेट तसेच बीओटीद्वारे होणारा विसर्गही बंद ठेवण्यात आला आहे.
दमदार पावसामुळे खरीप हंगामाला पोषक वातावरण निर्माण झाले असून भातरोप लागवडीसह शेतीच्या विविध कामांना वेग आला आहे. आगामी काही दिवसही पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
------------------
राधानगरी धरणाची सद्यस्थिती
धरण /41.29 टक्के
पाणीपातळी /313.25 फूट
पाणीसाठा / 3,499.84 द ल घ फूट
आतापर्यंतचा पाऊस /979 मिलिमीटर
आजचा पाऊस / 118 मिलिमीटर

Advertisement

Advertisement
Tags :

.