Radhanagari Dam Update: धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
यावर्षी 1 जूनपासून आजपर्यंत 3953 मिमी पावसाची नोंद झाली आहे
By : महेश तिरवडे
राधानगरी : आठ दिवसाच्या विश्रांती नंतर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, आज पहाटे धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे क्रमांक 3 आणि 6 खुले झाले आहेत. पहाटे 2.16 वाजता दरवाजा क्र. 3 तर त्यानंतर 4.17 वाजता दरवाजा क्र. 6 आपोआप उघडले, यामधून 2856 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
याशिवाय BOT पॉवर हाऊस मधूनही 1500 क्यूसेक पाणी सोडले जात असून एकूण 4356 क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 347.51 फूट असून, एकूण पाणीसाठा 8.36 टीएमसी इतका आहे. यावर्षी 1 जूनपासून आजपर्यंत 3953 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सततच्या पावसाने ओढे, नाले तुडुंब वाहू लागल्याने भोगावती नदी पात्रात वाढ होऊ लागल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे,