महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले! 4356 क्यूसेकने विसर्ग सुरू, यावर्षी पाचव्यांदा दरवाजे खुले

11:10 AM Sep 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
Radhanagari dam
Advertisement

राधानगरी / प्रतिनिधी

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी संध्याकाळ पासून पावसाचा जोर वाढल्याने शनिवारी सकाळी बंद झालेला दरवाजा पुन्हा एकदा यावर्षी पाचव्यांदा रविवारी दुपारी 2 वाजून 50 मिनिटाने एक व सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटाने दरवाजे अनुक्रमे 6 व 5 स्वयंचलित दरवाजे हे दरवाजे उघडले आहेत,गेल्या चार दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात व तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून असाच जोर राहिल्यास आणखीन दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.

Advertisement

सध्या धरणाची पाणी पातळी 347.32 फूट असून पाणीसाठा 8327.31 द ल घ फू, इतका असून दिवसभरात 22 मी मी पाऊस झाला असून आजतागायत 5342 मी मी नोंदला आहे, स्वयंचलित दरवाजे 6व 7 मधून 2856 क्यूसेक व खाजगी जलविद्युत केंद्रातून 1500 क्यूसेक असा एकूण 4356 क्यूसेकने विसर्ग भोगावती नदी पात्रता सुरू आहे, प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
Radhanagari dam
Next Article