राधानगरी धरण काठोकाठ...
कोल्हापूर :
कोल्हापूर शहरात पावसाचा जोर काहीअंशी कमी असला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसागणिक वाढच होत आहे. सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या राधानगरी धरण काठोकाठ भरले असुन 100 टक्के भरण्याच्या दिशेन वाटचाल सुरू आहे. कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी 10 वाजता राधानगरी धरण 98 टक्के भरले होते. जिल्ह्यातील 9 धरणे 100 टक्के भरली आहेत. चार धरणांचा पाणीसाठा 90 टक्क्याच्या पुढे गेला आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याते नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केवळ दूधगंगा आणि कासारी ही दोन धरणे 80 टक्क्याच्या आत आहेत.
भुदरगड तालुक्यातील कडगाव, शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथेही जोरदार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातील पावसाचा जोरही वाढला आहे. कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरूवारी आणि शुक्रवारी अतिवृष्टी झाली आहे.
- राधानगरी धरणाची 100 टक्क्याकडे वाटचाल
राधानगरी, वारणा, कासारी, कडवी, पाटगाव, चित्री, घटप्रभा, घामणी, कोदे या धरण क्षेत्रातही संततधार सुरू आहे. गेल्या आठ दिवसात राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गत शुक्रवारी राधानगरी धरणातील पाणीसाठा 90 टक्के होता. तो आता 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे.
- पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट
पावासाची उघडझाप सुरू असुन आज व उद्या दोन दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यानंतर 27 रोजी यलो अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे पावासाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
- नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यातून शुक्रवारी दुपारी 650 क्युसेक विसर्ग कुंभी नदीपात्रात सोडण्यात आला. पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने कुंभी आणि नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- धरण साठ्यातील नियोजन महत्वाचे
धरण साठ्यातील पाण्याचे नियोजन करुन महापुराची व्याप्ती कमी करता येऊ शकते. यापूर्वीच्या महापुरात फुटाने वाढणारी पंचगंगा इंचाने कमी होताना दिसली. यानंतर धरण व्यवस्थापणामुळे महापुराची दाहकता कमी झाली. यंदाही धरण पाणी साठा व्यवस्थापणाच्या नियोजनाची गरज आहे.
- जिल्ह्यातील धरणसाठा
धरणाचे नाव सध्याचा पाणीसाठा(टक्के) विसर्ग (क्युसेक)
राधानगरी : 98 1500
तुळशी : 81 100
वारणा : 82 6760
दुधगंगा : 77 1600
कासारी : 78 300
कडवी : 100 528
कुंभी : 84 300
पाटगाव : 98 350
चिकोत्रा : 92 00
चित्री : 100 341
जंगमहट्टी : 100 100
घटप्रभा : 100 3174
जांबरे : 100 240
आंबेओहोळ : 100 259
सर्फनाला : 100 341
धामणी : 100 4693
कोदे : 100 634