राधानगरी धरण पाणलोट क्षेत्र आणि शहरात जोरदार पाऊस, कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान
आणखीन दोन दिवस पाऊस राहणार
राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी शहरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विजांच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने आज पहाटे 6वाजले पासून जोरदार सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.आज सकाळपासून पावसाचा जोर असून ओढ्या नाले तुडुंब भरून भोगावती नदी पात्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे, हवामान खात्याने आणखीन दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे.
बुधवारी आज सकाळी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. सकाळी 6 वाजल्यापासून विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे भात पिकासह नाचणी, वरी,भुईमूग या काढणी पिकासह ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांचे हाल झाले.पाऊस सुरू झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांसह ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांची तारांबळ उडाली.
सध्या भात कापणी व मळणीची कामे सुरू असून शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. तसेच निपाणी-देवगड या राज्यमार्गावर राधानगरी येथील मुख्य बाजारपेठेत पावसाच्या पाण्यामुळे रस्ता जलमय झाल्यामुळे वाहन चालवताना वाहकाना कसरत करावी लागली,काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. सध्या दिवाळीचा सण असल्याने खरेदीचा परिणाम बाजारपेठेला व व्यापाऱ्यांना बसला आहे,तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे