Shahu Jayanti 2025: राधानगरी धरणस्थळ परिसरात साजरी होणार राजर्षी शाहू महाराज जयंती
सामाजिक कार्यकर्ते, शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील
By : महेश तिरावडे
राधानगरी : लोककल्याणकारी लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राधानगरी येथे भव्य जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षी शाहू स्मृती केंद्र स्मारक समिती, राधानगरी यांच्यावतीने हा सोहळा गुरुवार, २६ जून २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता पार पडणार आहे.
हा सोहळा छत्रपती राजर्षी शाहू स्मृती केंद्र, धरण स्थळ, फेजिवडे येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राधानगरी आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये युवक, युवती, माजी सैनिक, शेतकरी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
समितीने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोकुळ संचालक अभिजित तायशेटे यांनी केले आहे.