Radhanagari Dam: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम, 47 टक्के धरण भरले
पाऊस सुरु असल्याने राधानगरी धरणाची पाणी पातळी हळूहळू वाढत आहे
राधानगरी : राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पावसात सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला आहे. सध्या जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली असून काही ठिकाणी वाहतूक बंद झाली आहे.
पावसाची संततधार सुरु असल्याने राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे राधानगरी धरण 47 टक्के भरले आहे. या पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरल्यामुळे भोगावती नदी पात्रात कमालीची वाढ होताना दिसून येते. तसेच पाटबंधारे विभागाने संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी पाण्याचे विसर्गाचे योग्य नियोजन केले असून संभाव्य पूर परिस्थिती त्यामुळे टाळता येणार आहे.
राधानगरी धरण निर्मितीपासून मे महिन्यातच पहिल्यांदा अशा प्रकारचा पाऊस पडण्याची घटना ही पहिलीच घटना असल्याची माहिती जाणकारांकडून मिळत आहे. काल दिवसभरात 24 मी. मी पाऊस नोंदला असून मे महिन्यात पहिल्यांदा 250 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणी पातळी 40.33 फूट इतकी असून विसर्ग बंद करण्यात आला आहे.