For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राधानगरी दाजीपूर अभयारण्य दोन दिवस पर्यटकांसाठी बंद

01:19 PM Dec 25, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राधानगरी दाजीपूर अभयारण्य दोन दिवस पर्यटकांसाठी बंद
Advertisement

                                 गैरप्रकार टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय, अभयारण्य बंद

Advertisement

राधानगरी : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राधानगरी दाजीपूर वन्यजीव अभयारण्य ३० व ३१ डिसेंबर रोजी पर्यटकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार (वन्यजीव), कोल्हापूर यांनी दिली आहे.

दरवर्षी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर काही पर्यटक व हौशी लोकांकडून अभयारण्य क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करून चुली मांडणे, मद्यपान करणे, जंगलात आग लावणे, शिकार करणे तसेच गोंधळ घालण्याचे प्रकार घडतात. अशा अनाधिकृत व वन्यजीवांना धोका पोहोचवणाऱ्या घटनांची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

या कालावधीत अभयारण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाच्या संरक्षण पथकाकडून दिवस-रात्र गस्त घालण्यात येणार असून खबऱ्यांमार्फतही विशेष नजर ठेवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत तात्काळ व कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वन विभागाने दिला आहे.

पर्यटकांनी या निर्णयाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन राधानगरीच्या वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण व दाजीपूरचे वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर यांनी केले आहे

Advertisement
Tags :

.