रचिन रविंद्र मायदेशी रवाना
06:22 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
Advertisement
2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघातील अष्टपैलू न्यूझीलंडचा रचिन रविंद्र मायदेशी रवाना झाला. न्यूझीलंड संघात आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी रचिन रविंद्रचा समावेश करण्यात आल्याने तो आता आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही.
कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रांचायझीने त्याला मायदेशी जाण्याची परवानगी दिली. न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळणार आहे. तर न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यात 4 दिवसांची एकमेव कसोटी होणार आहे. ही कसोटी 27 ते 30 मे दरम्यान खेळविली जाईल.
Advertisement
Advertisement