रेबीजवर नियंत्रण मिळविणे शक्य
डॉ. मोहन कमत : गोकाकमध्ये जागतिक रेबीज प्रतिबंधक दिन
बेळगाव : श्वानांना वेळीच रेबीज प्रतिबंधक लस दिल्यास या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. प्राण्यांच्या मालकांनी आपण पाळलेल्या श्वानांच्या आरोग्याकडे वेळोवेळी लक्ष द्यावे. श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस देणे, मार्गसूचीचे पालन करणे गरजेचे आहे. श्वानदंशामुळे रेबीज होण्याचे प्रकार वाढीस लागले असून, प्राणीमालक व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पशुसंगोपन खात्याचे सहसंचालक डॉ. मोहन कमत यांनी पेले. येथील पशुचिकित्सालयाच्या आवारात जागतिक रेबीज प्रतिबंधक दिनानिमित सोमवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्वानदंश झाल्यानंतर घाबरून न जाता जखम साबण व वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर, विलंब न लावता डॉक्टरांची भेट घेऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा. प्राण्यांशी जबाबदारीने वर्तन करावे. लसीचे महत्त्व जाणून घेऊन वेळेत आणि योग्यरितीने बूस्टर डोस दिल्यास अपाय टाळता येणे शक्य आहे, असे डॉ. कमत म्हणाले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी, डॉ. वनिता हित्तलमनी, अधिकारी बाळगौडा पाटील, निर्मला जोगळे, मल्लिकार्जुन उप्पार व कर्मचारी उपस्थित होते.