‘लुक्खे’ सीरिजमध्ये राशी खन्ना
सीरिजचे पोस्टर प्रदर्शित
हिमांक गौरच्या दिग्दर्शनातील बहुप्रतीक्षित सीरिज ‘लुक्खे’च्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे. प्राइम व्हिडिओची नवी सीरिज ‘लुक्खे’ 8 एपिसोड्स असलेली म्युझिकल अॅक्शन ड्रामा सीरिज आहे. विपुल डी. शाह आणि राजेश बहल याहंनी ऑप्टिमिस्टिक्स एंटरटेनमेंट आणि व्हाइट गोरिल्ला एलएलपीच्या बॅनर अंतर्गत याची निर्मिती केली आहे.
‘लुक्खे’ची कहाणी चंदीगडचे रॅप कल्चर आणि स्ट्रीट राइवलरीवर आधारित आहे. यात दोन रॅपर्स ‘एमसी बदनाम’ आणि ‘ओजी’ची टक्कर दाखविण्यात आली आहे. त्यांचे हे शत्रुत्व सूड, स्वप्ने आणि जीवनाच्या प्रवासाला जोडते. सीरिजची टॅगलाइन ‘रॅप और बदला, दोनों लाउड है’ अशी आहे.
सीरिजमध्ये अनेक कलाकार
या सीरिजमध्ये राशी खन्ना, प्रसिद्ध रॅपर-गीतकार किंग हे मुख्य भूमिकेत आहेत. तर पलक तिवारी, लक्षवीर सिंह सरन देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याचबरोबर नकुल रोशन साहदेव, कृतिका भारद्वाज, शिवांकित परिहार, योगराज सिंह आणि आयशा रजा मिश्रा देखील या सीरिजमध्ये दिसून येणार आहेत. लुक्खे सीरिज 8 मेपासून प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज फुल ऑफ म्युझिक, रॅप आणि थ्dिरालने भरपूर असणार आहे.