For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अक्षय कुमारच्या चित्रपटात राशीची वर्णी

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
अक्षय कुमारच्या चित्रपटात राशीची वर्णी
Advertisement

अनीज बजमी हे अक्षय कुमारला सोबत घेत एक चित्रपट निर्माण करणार असून यात विद्या बालनही दिसून येणार आहे. जवळपास 6 वर्षांनी अक्षय आणि विद्या ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहता येणरा आहे. तर आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. चित्रपटात राशी खन्नाची वर्णी लागली असून याचे चित्रिकरण अत्यंत लवकरच सुरू होणार आहे. निर्मात्यांनी राशीच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून तिचा 120 बहादुर चित्रपटातील दमदार अभिनय पाहून चित्रपटाची टीम प्रभावित झाली आहे. तर यापूर्वी याकरता दिशा पाटनी आणि फातिमा सना शेख यांचे नाव चर्चेत होते असे समजते. अनीस आणि अक्षय हे अनेक वर्षांनी एकत्र येत असल्याने चाहते उत्सुक आहेत. दोघांनी यापूर्वी वेलकम यासारखा हिट चित्रपट दिला आहे. तर अक्षय सध्या स्वत:चा आगामी चित्रपट भूत बंगलाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. हा चित्रपट 15 मेपर्यंत प्रदर्शित होऊ शकतो. याचबरोबर त्याचा आणखी एक चित्रपट वेलकम टू द जंगल देखील चालू वर्षात झळकणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.