For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

१२ जूनला झळकणार ‘राख’ सीरिज

06:11 AM Jun 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
१२ जूनला झळकणार ‘राख’ सीरिज
Advertisement

मिर्झापूर या सीरिजमधील ‘गुड्डू भैया’ या भूमिकेमुळे प्रसिद्ध अली फजल आता पुन्हा एकदा ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी तो गुन्हेगार म्हणून नव्हे तर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असणार आहे. अली फजल नवी वेबसीरिज ‘राख’सोबत ओटीटीवर परतणार आहे. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. ही सीरिज एक इन्व्हेस्टिगेटिंग थ्रिलर असून त्याची कहाणी अनुशा नंदकुमार आणि संदीप साकेत यांनी मिळून लिहिली आहे तसेच दिग्दर्शनही केले आहे. सीरिज गुन्हेगारीची मानसिकता आणि सामान्य जीवनामागे दडलेल्या अंधाराला दाखविणारी आहे.

Advertisement

दोन किशोरवयीन अचानक गायब झाल्यावर आनंदी परिवार कोलमडून पडतो, आणि पूर्ण शहरात दहशत निर्माण होते. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक तपास अधिकारी (अली फजल) देशभरात शोधमोहीम सुरु करतो, परंतु हे प्रकरण त्याला हिंसा आणि मानवीक क्रूरतेच्या एका भयावह जगतात ओढून घेते. अली फजलसोबत या सीरिजमध्ये सोनाली बेंद्रे, आमीर बशीर मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज 12 जून रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. राख या सीरिजनंतर अली फजल हा मिर्झापूर अन् बंटवारा 1947 या चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.