For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आर. आर. स्वैन आता जम्मू काश्मीरचे डीजीपी

06:27 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आर  आर  स्वैन आता जम्मू काश्मीरचे डीजीपी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून आर. आर. स्वैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही नियुक्ती केली आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार होता. नजिकच्या काळात काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने त्यांची ही नियुक्ती तातडीने करण्यात आली आहे. तसेच गेल्या काही महिन्यात जम्मू भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झालेली असतानाच त्यांना या पदावर आता कायम करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.