आर. प्रज्ञानंदचा विश्वविजेत्या कार्लसनला आणखी एक धक्का
xx
xx
``x
येथे सुरू असलेल्या चेसेबल मास्टर्स ऑनलाईन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेतील पाचव्या फेरीत भारताचा 16 वर्षीय ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदने नॉर्वेचा विश्व़विजेता मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रज्ञानंदचा कार्लसनवरील हा दुसरा विजय आहे.
या स्पर्धेतील पाचव्या फेरीतील हा डाव बरोबरीच्या दिशेने झुकला होता. पण प्रज्ञानंदच्या केवळ एका चालीमुळे विश्वविजेत्या कार्लसनला पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयामुळे ग्रॅण्डमास्टर प्रग्यानंदने स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाचवे स्थान मिळविले असून ग्रॅण्डमास्टर कार्लसन 12 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. चीनचा ग्रॅण्डमास्टर वेईने या स्पर्धेच्या दुसऱया दिवसाअखेर 18 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या एअरथिंग्ज मास्टर्स ऑन लाईन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंदने कार्लसनचा पराभव केला होता.