‘लिगेसी’मध्ये आर. माधवन मुख्य भूमिकेत
क्राइम थ्रिलर सीरिजमध्ये झळकणार
नेटफ्लिक्सने स्वत:ची आगामी हायस्टेक तमिळ क्राइम थ्रिलर सीरिज ‘लिगेसी’ची घोषणा केली आहे. याचबरोबर या प्रोजेक्टचा एक ड्रामेटिक फर्स्ट लुक पोस्टर आणि काही तपशील जारी करण्यात आला आहे. लवकरच ही सीरिजप स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून यात सत्ता, परिवार आणि एक संकटग्रस्त साम्राज्याविषयी रोमांचक कहाणी पहायला मिळणार आहे. कहाणी पेरियावर केंद्रीत असून तो एक दुर्जेय माफिया परिवाराचा प्रमुख असून तो वृद्ध होत चालला आहे. त्याच्या विशाल साम्राज्यासाठी एका उत्तराधिकाऱ्याचा शोध घेतला जातो, त्याला केवळ स्वत:चे प्रियजन आणि स्वत:च्या अवैध व्यवसाय अन् वारशाच्या रक्षणाची चिंता असते. या सीरिजमध्ये आर. माधवन, निमिषा सजयन, गौतम कार्तिक, गुलशन देवैया आणि अभिषेक बॅनर्जी यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. चारुकेश शेखरने याची कहाणी लिहिली असून त्यानेच दिग्दर्शन केले आहे. फर्स्ट लुक पोस्टरमध्ये आर. माधवन नव्या रुपात दिसून येत आहे. एक अभिनेता म्हणून रोमांचित करणारी कहाणी फारच कमी वेळा मिळत असते. याचमुळे मी लिगेसीचा हिस्सा होता आल्याने उत्साही आहे. ही कहाणी अत्यंत चतुरपणे लिहिण्यात आली असून यात अनेक ट्विस्ट आहेत. चारुकेश सारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे खरोखरच आनंददायी असल्याचे अभिनेता माधवनने म्हटले आहे.