For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मूळ रहिवाशाच्या दर्जाकरता सोडा कुप्रथा

06:01 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मूळ रहिवाशाच्या दर्जाकरता सोडा कुप्रथा
Advertisement

आसाम मुख्यमंत्र्यांची बांगलाभाषिक मुस्लिमांना सूचना

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांन बांगलाभाषिक मुस्लिमांना बालविवाह आणि बहुविवाह यासारख्या कुप्रथा सोडून द्याव्या लागतील तरच ते राज्याचे मूळ रहिवासी ‘खिलोंजिया’ मानले जातील असे म्हटले आहे. शर्मा यांनी यापूर्वी राज्यातील बांगलाभाषिक मुस्लीम समुदायाला सामाजिक कुप्रथांसाठी जबाबदार मानले होते. या समुदायात बहुतांशकरून बांगलादेशातून आलेले मुस्लीम आहेत.

Advertisement

बांगलाभाषिक मुस्लीम हे मूळ रहिवासी आहेत की नाहीत हा एक वेगळा विषय आहे. जर त्यांना मूळ रहिवासी व्हायचे असेल तर तर आम्हाला कुठलीच समस्य नाही. परंतु याकरता त्यांना बालविवाह आणि बहुविवाहाची कुप्रथा सोडून देत महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे लागणार आहे. आसामी लोकांची एक संस्कृती असून यात मुलींची तुलना ‘शक्ती’ (देवी)शी केली जाते आणि दोन-तीनवेळा विवाह करणे आसामी संस्कृती नसल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.

तरच मानू स्वदेशी

बांगलादेशी मुस्लिमांनी स्वदेशी होण्यात कुठलीच समस्या नाही. परंतु ते बहुविवाह करू शकत नाहीत. ही आसामी संस्कृती नाही. कुठल्याही वैष्णव मठाच्या भूमीवर अतिक्रमण करून ते मूळ रहिवासी होऊ शकत नाहीत. आसामी प्रथा परंपरांचे पालन बांगलाभाषिक मुस्लिमांना केले तर त्यांनाही स्वदेशी मानले जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिक्षणाचे महत्त्व

बांगलाभाषिक मुस्लिमांनी स्वत:च्या मुलांना मदरशांऐवजी शाळांमध्ये पाठवावे आणि त्यांना डॉक्टर तसेच इंजिनियरच्या स्वरुपात कारकीर्द घडविण्यास प्रोत्साहन द्यावे. काही प्रथा सोडल्यास आणि आसामी संस्कृती स्वीकारल्यास त्यांना काळासोबत स्वदेशी मानले जाऊ शकते असे शर्मा यांनी सांस्कृतिक एकीकरणाच्या आवश्यकतेबद्दल म्हटले आहे.

मुस्लिमांची संख्या लक्षणीय

आसाममध्ये मुस्लिमांची लोकसंख्या महत्त्वपूर्ण आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिमांची हिस्सेदारी 34 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या लोकसंख्येत दोन वेगवेगळे समुदाय सामील आहेत, यात बांगलाभाषिक आणि बांगलादेशी मुस्लीम आहेत. तसेच आसामी भाषिक म्हणजेच स्वदेशी मुस्लीम आहेत. स्वदेशी म्हणवून घ्यायचे असेल तर बांगलाभाषिक मुस्लिमांनी मुलांना मदरशांध्ये पाठविण्याऐवजी शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवावे. तसेच स्वत:च्या मुलींना शाळेत पाठविण्यास सुरुवात करावी. तसेच मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार द्यावा असे शर्मा यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.