क्वीक कॉमर्स झेप्टो आणणार आयपीओ
06:16 AM Mar 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
क्विक कॉमर्स कंपनी झेप्टो आपला आयपीओ लवकरच आणणार आहे. आयपीओच्या आधी कंपनी 20 ते 25 कोटी डॉलर रुपयांची उभारणी करणार असल्याची माहिती आहे. आयपीओ यावर्षी कंपनी आणणार असून यासंदर्भात एडलवाईज फायनान्शिअल सर्विसेस आणि सध्याचे गुंतवणूकदार मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस यांच्यासोबत कंपनी चर्चा करत असल्याची माहिती आहे. 25 कोटी डॉलर रुपयांच्या मूल्यांचे समभाग गुंतवणूकदारांना दिले जाणार आहेत. या कंपनीमध्ये जनरल कॅटालिस्ट, एपिक कॅपिटल अॅडव्हायझर्स, स्टेपस्टोन ग्रुप, डीएसटी ग्लोबल आणि नेक्सस वेंचर पार्टनर्स यासारखे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारसुद्धा आहेत.
Advertisement
Advertisement