For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘भुताटकीयुक्त’ घर खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा

06:23 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘भुताटकीयुक्त’ घर खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा
Advertisement

जपानमध्ये अजब प्रकार

Advertisement

जपानच्या रियल इस्टेट मार्केटमध्ये सध्या अजब ट्रेंड दिसून येत आहे. ज्या घरांना कधी लोक भुताटकीयुक्त किंवा अशुभ मानून खरेदी करण्यास टाळत होते, आता तीच घरं लोकांची पसंत ठरत आहेत. अशा घरांना जपानमध्ये जिको बुकेन म्हटले जाते, म्हणजेच अशा मालमत्ता जेथे कधी आत्महत्या, हत्या किंवा एकाकी माणसाचा मृत्यू झाला असेल. दशकांपासून जपानी समाजात या घरांना आध्यात्मिक स्वरुपात योग्य मानले जात नव्हते, परंतु आता त्यांना मोठी मागणी आहे.

महागाईचा प्रभाव

Advertisement

सद्यकाळात जपानमध्ये राहण्याचा खर्च इतका वाढला आहे की सामान्य लोकांसाठी चांगले घर मिळविणे अवघड ठरले आहे. टोकियो सारख्या शहरात मालमत्तेच्या किमती उच्चांकी स्तरावर आहेत. अशास्थितीत जिको बुकेन घरांच्या किमतीत मोठी सूट मिळते, जी अनेकदा बाजारभावापेक्षा 20-25 टक्क्यांनी कमी असते आणि बजेटफ्रेंडली खरेदीदार आणि गुंतवणुकदारांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.

आता लोक अंधश्रद्धेपेक्षा अधिक स्वत:च्या खिशाला महत्त्व देत आहेत, जी युवा पिढी पूर्वी या गोष्टींना घाबरत होती, ती आता याला एक स्मार्ट फायनान्शियल निर्णय मानत आहे. जपानमध्ये या बदलत्या ट्रेंडला लोकप्रिय करण्यात कॉमेडियन तानीशी मात्सुबारा यांचे नाव सर्वात वर आहे. ज्यांनी मागील एक दशकापेक्षा अधिक काळापासून जाणूनबुजून अशा मालमत्तांमध्ये राहून या भीतीयाला एका नव्या दृष्टीकोनातुन सादर केले आहे.

मात्सुबारा यांनी या घरांमध्ये राहण्यालाच स्वत:च्या कारकीर्दीचा हिस्सा केले आणि ते सातत्याने अशा ठिकाणी राहतात, जेथे कुणाचा वेदनादायी मृत्यू झाला होता. वाढती महागाई आणि महाग होणाऱ्या भाड्याच्या काळात जपानी युवा आता अंधश्रद्धा किंवा जुन्या टॅबूऐवजी स्वत:च्या आर्थिक गरजांना अधिक प्राथमिकता देत आहेत.

डेमोग्राफीही जबाबदार

जपानची बदलती डेमोग्राफी देखील या स्थितीसाठी जबाबदार आहे. तेथे वृद्धांची संख्या वेगाने वाढत आहे आणि अनेक वृद्ध एकाकी राहत आहेत, ज्यांच्या मृत्यूचा थांगपत्ता अनेक दिवसांनी लागत असतो. अशप्राकारचे सोशल आयसोलेटेड डेथ्सच्या वाढत्या घटनांनी या स्टिग्माटाइज्ड घरांच्या संख्येत वाढ केली आहे. जपानच्या नॅशनल पॉलिसी एजेन्सीनुसार जपानमध्ये एकाकी राहणाऱ्या लोकांच्या मृत्यूची प्रकरणे वाढली आहेत, ज्यामुळे अशा घरांचा पुरवठा देखील वाढला आहे.

नव्या बिझनेसची वाढली मागणी

या वाढत्या मागणीसोबत जपानमध्ये एक नवी इंडस्ट्री बहरत आहे, आता अनेक कंपनया अशा घरांच्या ‘शुद्धीकरणा’चे काम करतात. जपानमध्ये स्टिग्माटाइज्ड प्रॉपर्टीजची सफाई आणि नुतनीकरण करणाऱ्या प्रमुख कंपन्यांपैकी एक निक्केई मार्क्सचे अध्यक्ष हानाहारा कोजी आहेत. ते अशा प्रॉपर्टीजना रिहॅबिलेटेट करून पुन्हा मार्केटमध्ये आणण्याचे काम करतात. त्यांच्या कंपनीकडून बौद्ध भिक्षूंच्या माध्यमातून विशेष विधी करविण्यात येतात, जेणेकरून ‘भटकत्या आत्म्यां’ना शांती मिळेल आणि घर राहण्यायोग्य करता येऊ शकेल.

काही रियल इस्टेट एजंट तर रितसर थर्मल कॅमेरे आणि सेंसरचा वापर करत घरात कुठलीच भुताटकी नसल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. अनेक स्टार्टअप आता केवळ याच प्रॉपर्टीजचे व्यवस्थापन अन् नुतनीकरण करण्याचे काम करत आहेत, ज्यामुळे गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळत आहे. परंतु हा बदल काही एका रात्रीत घडलेला नाही.

जपानी संस्कृतीत यूरेईची (आत्मा) भीती अत्यंत मोठी आहे. परंतु आर्थिक दबावांनी या भीतीवर विजय मिळविला आहे. आता लोक या घरांना केवळ एक भुताटकीयुक्त ठिकाण नव्हे तर प्रॉपर्टी मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा एक स्वस्त पर्याय म्हणून पाहत आहेत.

Advertisement
Tags :

.