For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरगुती गॅस ई-केवायसीसाठी रांगा

10:43 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
घरगुती गॅस ई केवायसीसाठी रांगा
Advertisement

केंद्र सरकारचा आदेश : वितरकांच्या कार्यालयासमोर गर्दी

Advertisement

बेळगाव : केंद्र सरकारने घरगुती गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे शहरातील गॅस वितरकांकडे ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. गुरुवारी कॅम्प येथील एका गॅस वितरकाच्या कार्यालयाबाहेर ई-केवायसीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, गर्दीमुळे काही नागरिकांना ई-केवायसीविना माघारी परतावे लागले. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्व गॅस ग्राहकांनी आपल्या गॅस कनेक्शनला बायोमेट्रिक म्हणजेच ई-केवायसी प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी ग्राहकाच्या अंगठ्याचा ठसा घेतला जात आहे. यासाठी आधारकार्ड, गॅसकार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक गरजेचा आहे. पंधरा दिवसांपासून गॅसच्या ई-केवायसीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, दोन दिवसांत ग्राहकांनी ई-केवायसीसाठी गर्दी केली आहे. त्यामुळे शहरातील गॅस वितरक कार्यालयांसमोर ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि सामान्य ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनंतर गॅस एजन्सींनी याबाबत काम सुरू केले आहे, अशी माहिती गॅस वितरकांनी दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.