क्वॉलिटी पॉवरचा समभाग सूचीबद्ध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
क्वॉलिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विटमेंटस् यांचा आयपीओ सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी बाजारात सूचीबद्ध झाला आहे. सुरुवातीला काहीसा तेजीसोबत खुला झालेला समभाग दिवसअखेर नुकसानीसह बंद झाल्याचे दिसून आले.
प्रतिसाद कमी
गुंतवणुकदारांनी सदरचा आयपीओ 1.29 पट सब्रस्काईब केला होता. सदरचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान खुला होता. 5.2 दशलक्ष नवे इक्विटी समभाग आणि 14.90 दशलक्ष इक्विटी समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनीने ठेवले होते. 401 ते 425 इशु किंमत होती. ऊर्जा वहन घटक आणि ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सदरची कंपनी कार्यरत आहे.
किती उभारणार रक्कम
858 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून उभारले जाणार असून या आयपीओला गुंतवणूकदारांनी अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद नोंदवला होता. सदरचा समभाग बीएसईवर 432 रुपयांवर (425 रुपये इशु किंमत) खुला झाला तर एनएसईवर 1.18 टक्के प्रिमीयमसह 430 रुपयांवर सुचीबद्ध झाला. पण यानंतर मात्र समभाग 11 टक्के घसरत 383 च्या स्तरापर्यंत घसरला होता.