महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्य कबड्डी असोसिएशनची चौवार्षिक निवडणूक 21 जुलैला

06:07 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अजित पवार यांची घोषणा

Advertisement

प्रतिनिधी/ कोल्हापूर

Advertisement

महाराष्ट्र राज्य कबड्डीअसोसिएशनची चौवार्षिक निवडणूक ही 21 जुलै रोजी होईल. या निवडणुकीची प्रक्रिया केंद्र सरकारच्या स्पोर्टस् कोड-2011 या कायद्यानुसार राबवली जाणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी जाहीर केले. मुंबईतील शिवाजी पार्क येथील राज्य असोसिएशनच्या कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव (बुवा) साळवी सभागृहात आयोजित केलेल्या 64 व 65 व्या संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावऊन बोलत होते. सभेच्या प्रारंभी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांची मांडणी करण्यात आली. त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली. यानंतर सभेला संबोधताना पवार यांनी राज्य असोसिएशनच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच निवडणुकीसाठी निवृत्त न्यायधीश दिलीप जोशी यांची निवडणूक अधिकारी म्हणून निवड केल्याची घोषणाही पवार यांनी यावेळी केली. सभेला असोसिएशनचे पदाधिकारी, प्रतिनिधी, आजीव सदस्य, खेळाडू असे दोनशेहून अधिकजण उपस्थित होते. कोषाध्यक्ष मंगल पांडे यांनी स्वागत केले. सहकार्यवाह रवींद्र देसाई यांनी दिवंगताच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला. यावेळी असोसिएशनचे मुंबई शहराध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी आमदार दिनकर पाटील, आमदार अमरसिंह पंडित, शकुंतला खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article