कासिम सुलेमानीची भाची अडचणीत
अमेरिकेत मुलीसोबत घेतले गेले ताब्यात
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या कुद्स फोर्सचे नेतृत्व करणारा जनरल कासिम सुलेमानीची नातेवाईक आणि तिची मुलगी अमेरिकेच्या ‘आईस’ पथकाच्या ताब्यात आहे. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने ही माहिती दिलीआहे. हमीदा सुलेमानी अफशार आणि तिच्या मुलीचे ग्रीनकार्ड अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने रद्द करण्यात आल्यावर त्यांना अटक करण्यात आली. हमीदा सुलेमानी ही कासिम सुलेमानीची भाची आहे.
सुलेमानी अफशार ही इराणची हुकुमशाही, दहशतवादी राजवटचे प्रखर समर्थक होती. अफशारच्या पतीवरही अमेरिकेत प्रवेशबंदी आहे. बगदाम विमानतळानजीक 2020 मध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानीचा अंत झाला होता.
इराणींचा व्हिसा रद्द
अमेरिकेतील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणचे वर्तमान सरकार किंवा पूर्वीच्या सरकारशी संबंधित कमीतकमी 4 इराणी नागरिकांचे ग्रीनकार्ड किंवा अमेरिकन व्हिसा रद्द केला आहे. यातील दोन जणांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्यांना आता देशाबाहेर काढले जाणार आहे.
-अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी अलिकडेच फातिमा अर्देशीर-लारिजानीचा व्हिसा रद्द केला. ती इराणचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारिजानीची मुलगी आहे.
-अली लारिजानी हे मागील महिन्यात अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेले. फातिमाचा पती सैयद कलंतर मोमामेदी याचाही व्हिसा रद्द करण्यात आला. दोघेही आता अमेरिकेत नाहीत.