For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pydhonie incident | कलिंगड की विष? पायधुनीतील डोकाडीया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ; सोशल मीडियावरील 'त्या' थिअरीने उडाली खळबळ

01:41 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
pydhonie incident   कलिंगड की विष  पायधुनीतील डोकाडीया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ  सोशल मीडियावरील  त्या  थिअरीने उडाली खळबळ
Advertisement

                   पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे कलिंगड कारण?

Advertisement

सातारा : मुंबई पायधुनी येथील एकाच कुटुंबातील चौघांचा विबर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली असून सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्टमुळे कलिंगडाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे.

पायधुनी येथील डोकाडीया कुटुंबीयांनी दि. २५ एप्रिल रोजी बिर्याणी खाल्ली त्यानंतर ऑनलाईन मागविलेले कलिंगड या कुटुंबाने खाल्ले, त्यानंतर त्यांना उलट्या व जुलाब होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही घटना बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्याने झाली असा संशय व्यक्त होऊ लागला, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ही घटना व्हायरल झाल्याने त्याचा परिणाम कलिंगड विक्रीवर झाल्याचेचित्र पहायला मिळत आहे.

Advertisement

कलिंगडाला सर्प दंश
सोशल मीडियावर अफवांचा बाजार एखाद्या जंगलात लागलेल्या आगीसारखा बेलगाम पसरतो, कलिंगडाला सापाने दंश केला असेल आणि ते विष फळात पसरल्याने ते खाऊन त्यांचा मृत्यू झाला असेल व्हाट्सअॅप अशा युनिव्हर्सिटीमधील तज्ज्ञांकडून सांगितले जाऊ लागल्याने सामान्य जनतेत भीतीचे वातावरण आहे.

Advertisement
Tags :

.