पी व्ही सिंधू चा विवाह २२ डिसेंबरला
भारताची बॅडमिंटन स्टार पुसारला वेंकट सिंधू अर्थातच ऑलिंपिकपटू पी व्ही सिंधू हीची लगीन घाई सुरु झाली आहे. २२ डिसेंबर रोजी उदयपूर, राजस्थान इथे हा लग्नसोहळा थाटात पार पडणार आहे. हैदरबादच्या पोसीडेक्स टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक वेंकट दत्त साई यांच्याशी पी व्ही सिंधूची लग्नगाठ बांधली जाणार आहे.
लग्नाचे विधी २० डिसेंबर रोजी सुरू होतील. २४ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे रिसेश्पन होईल. आमची दोन्ही कुटुंबं एकमेकांना आधीपासूनच परिचयाची होती. साधारण महिन्याभरापूर्वी लग्नाच्या सर्व गोष्टी ठरविण्यात आल्या. पी व्ही सिंधू विविध स्पर्धांमध्ये जानेवारीपासून व्यग्र होती. त्यामुळे डीसेंबर महिन्यात या सोहळ्याचे आयोजन शक्य होते. लग्नानंतर नववर्षात जानेवारी महिन्यात सिंधू आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सक्रिटमध्ये परत येऊ शकते, याची खात्री करण्यासाठी लग्नाचे नियोजन काळजीपूर्वक करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधू यांचे वडील पी व्ही रामणा यांनी वृत्तसंस्थेला दिली.
सिंधूने नुकत्याच लखनौ येथे पार पडलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. २०२१ मध्ये सिंधूने टोकयो २०२० ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. यामुळे ती दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. त्यानंतर २०२२ मध्ये बॅडमिंटर आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. या सामन्यादरम्यान तिच्या डाव्या घोट्याला तणावग्रस्त फ्रॅक्चर होऊनही तिने पहिले राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकले. सिंधू हिने ऑल्मपिक आणि बी. डब्लू. एफ सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.
पी व्ही सिंधू यांचे लग्न हैदराबादच्या वेंकट दत्ता साई यांच्याशी ठरले आहे. ते सध्या पोसीडेक्स टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. यांनी फाऊंडेशन ऑफ लिबरल अॅंड मॅनेजमेंट एज्युकेशनमधून लिबरल आर्टस् अॅण्ड सायन्सेसमध्ये डिप्लोमा केला आहे. २०१८ मध्ये फ्लेम युनिव्हर्सिटी मधून अकाऊंटींग अॅण्ड फायनान्समध्ये बीबीए पदवी घेतली. त्यानंतर बंगळूर इंटरनॅशनल स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथून डेटा सायन्स आणि मशिन्स लर्निंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. वेंकट दत्ता साई यांनी जे एस डबल्युमध्ये काम केले. सावर अॅसेट्स मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. यानंतर २०१९ मध्ये ते पोसीडेक्स मध्ये रुजू झाले.