For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पीव्ही सिंधू बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्ससाठी पात्र

06:45 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
पीव्ही सिंधू बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्ससाठी पात्र
Advertisement

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर झेप

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताची दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू, बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर स्पर्धेतील सातत्यपूर्ण दमदार कामगिरीच्या जोरावर हंगामाच्या शेवटी होणाऱ्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायलन्ससाठी पात्र ठरली आहे.

Advertisement

बीडब्ल्यूएफ फायनल्समध्ये सर्व प्रकारांतील अव्वल आठ खेळाडू किंवा जोड्या सहभागी होतात. ही स्पर्धा यावर्षी 9 ते 13 डिसेंबर दरम्यान चीनमध्ये आयोजित केली जाणार आहे. हायलो ओपनचे विजेतेपद पटकावल्यानंतर महिला एकेरी क्रमवारीत सिंधू जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. डिसेंबर 2022 नंतरची तिची ही सर्वोत्तम रँकिंग असून यामुळे ती या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

रविवारी झालेल्या हायलो ओपनमध्ये सिंधूने डेन्मार्कच्या लाईन क्युर्सफेल्डचा पराभव करून या हंगामातील आपले दुसरे विजेतेपद मिळविले. जर्मनीतील या स्पर्धेत तिने वर्चस्व गाजवत सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. प्रेंच ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावल्यानंतर (जिथे तिला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आन से यंगकडून पराभव पत्करावा लागला होता), अवघ्या एका आठवड्यात सिंधू पुन्हा एकदा विजेतेपदाच्या शिखरावर पोहोचली आहे. तिने यापूर्वी 2018 मध्ये बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद जिंकले होते.

याआधी जुलै महिन्यात सिंधूने जपान ओपनचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे हायलो ओपन हे या हंगामातील तिचे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर वरील दुसरे विजेतेपद ठरले आहे. याशिवाय ती फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत तर मलेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचली होती.

Advertisement
Tags :

.